,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती 28 ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे , पर्यवेक्षिका लता घाटे समिती प्रमुख प्राध्यापिका नंदा भोयर उपस्थित होत्या. सर्वप्रथम महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले लता घाटे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन एमसीवीसी विभागाच्या प्रमुख प्रा.आरजू आगलावे यांनी केले .
,
Home Breaking News महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,