शिवभूमी विद्यालयात कार्यरत शिक्षिका लेखिका कवयित्री कोठेकर योगिता यांनी कवितेच्या माध्यमातून जिंकली विद्यार्थ्यांची मने

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

चिखली ,पुणे ; श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारीत विद्यालय चिखली, पुणे विद्यालयात **द्विदशकपूर्ती* *निमित्ताने *लेखक, कवी आपल्या भेटीला* या उपक्रमांतर्गत *कवयित्री मा. योगिता संजय कोठेकर* यांना आमंत्रित केले गेले या निगडी परिसरातील शिवभूमी विद्यालयात गेले तीस वर्ष उपक्रमशिल तंत्रशिक्षिका म्हणून त्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत तसेच त्यांनी आपल्या कवितेने साहित्य क्षेत्रातही बरेच नाव कमावले आहे . त्या कवितेच्या माध्यमातून आनंददायी अध्यापन करत असतात . तसेच त्यांची तीन पुस्तकेही प्रकाशित आहेत संस्कार चारोळी हे पुस्तक त्यांनी विद्यार्थ्यासाठी लिहीले आहे, त्यांच्या प्रत्येक नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान मिळत असते . त्यांना या दोन्ही क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळाले आहे . त्यांच्या याच कार्याचा आढावा घेऊन श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारीत विद्यालय चिखली, पुणे विद्यालयात *द्विदशकपूर्ती *निमित्ताने *लेखक, कवी आपल्या भेटीला* या उपक्रमांतर्गत त्यांना बोलावले गेले यांच्याशी ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधला. जसे की- कविता लेखनाची प्रेरणा कोणाकडून मिळाली ? तुम्हाला कविता कशा सुचतात? तुम्ही लिहिलेली पहिली कविता कोणती ? कविता लेखनासाठी आम्ही काय केले पाहिजे? तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कवयित्री लेखिका ,शिक्षिका योगिताताईंची ओळख करून घेतली तसेच योग्य आहार, शिवाजी महाराजांचा पराक्रम आपला देश आई वडील या विषयावरील मराठी व हिंदी कविता, चारोळ्या यांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला.
अतिशय हसत – खेळत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घेत , योगिताताईंनी विद्यार्थ्यांना कविता म्हणून दाखविल्या, विद्यार्थी उत्सुर्तपणे कवितेच्या ओळी म्हणून दाद देत होते, अगदी सोप्या सहज भाषेतील गेय स्वरूपातील कविता विद्यार्थ्यांना आवडत होत्या असे विद्यार्थ्यांच्या टाळयांतून स्पष्ट दिसत होते.अध्यापिका श्रीमती साधनाताईंचा संकल्प कवयित्री मा.योगिताताईंच्या उपस्थितीमुळे अविस्मरणीय असा ठरला. या निमित्ताने योगीताताईंनी आपली पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली .या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व अध्यापक, मा.वैशालीताई नरवडे,(माध्यमिक मुख्याध्यापिका)मा.श्री. गौतम इंगळे (प्राथमिक मुख्याध्यापक) या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शाळेच्या व्यवस्थापक डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच कोठेकर योगिता यांना पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here