By : Shankar Tadas
कोरपना : महसूल विभागातर्फे एक ते पंधरा ऑगस्ट महसूल पंधरवाडा निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने महसूल जनसंवाद कार्यक्रम तहसील कार्यालय कोरपना च्या सभागृहात 8 ऑगस्ट रोजी पार पडला. या महसूल जनसंवाद कार्यक्रमात महसूल विभागाशी संबंधित विविध समस्यां, अडचणी चे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर, नायब तहसीलदार प्रवीण चिडे प्रामुख्याने उपस्थित होते. याच कार्यक्रमात विविध दाखले , नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्याना धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी , तालुक्यातील नागरिक आदी उपस्थित होते.





