घर जळून लाखोंचे नुकसान, नारायण हिवरकर यांच्यातर्फे आर्थिक मदत

by : Shankar Tadas

कोरपना :  तालुक्यातील कन्हाळगाव येथील गोपाल गाजुर्लावार यांचे घर शॉर्ट सर्किटने जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. कन्हाळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा कोरपना तालूका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी नुकसान ग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व आर्थिक मदत दिली.

गोपाल गाजुर्लावार यांच्या घराला घरी कोणीही नसताना आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. त्या मध्ये घरातील सामान, धान्य,पैसे,कपडे,मोबाईल, एक नग बकरी आदी साहित्य जळुन खाक झाले.  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले व आर्थिक मदत दिली.  शासनाने योग्य चौकशी करून नुकसानग्रस्त कुटुंबाला त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी  चंद्रभान क्षिरसागर, नारायण पेचे, सुभाष नांदेकर, विठ्ठल पारखी, लसंते,राजु पारखी, नाना येरेकर आदी गावातील नागरिक महिला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here