गुरु नानक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली समाज जागृती पर प्रभात फेरी

लोकदर्शन 👉शुभम पेडामकर

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी गुरु नानक कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या स्टुडंट्स काऊन्सिलने तसेच माजी विद्यार्थी संघटना, रोट्रॅक क्लब यांनी ‘द हॅपीनेस मार्च: वॉक फॉर मेंटल हेल्थ’ या प्रभातफेरीचे आयोजन केले होते. रोज थोडं चालल्यामुळे ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत होते.
या प्रभातफेरीचा ​​मुख्य उद्देश केवळ विद्यार्थ्यांच्या मनातील ताणतणाव दूर करणे आणि आनंदी वातावरण निर्माण करणे हा होता. या 5 किमी अंतरात पार पडलेल्या प्रभातफेरीत 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये या प्रभातफेरीबद्दल प्रचंड उत्साह होता.
निसार कुलकर्णी, पी.आय प्रभा राऊळ आणि गुरू नानक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर जी. भाटिया यांनी या प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखवला.
प्रभातफेरीनंतर विद्यार्थी पुन्हा कॉलेजच्या प्रांगणात आले आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
‘तुमचे स्वत्व बनणे हा चांगल्या मानसिक आरोग्याचा सर्वात मजबूत घटक आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उंची गाठण्यात मदत होईल’, असे म्हणत डॉ पुष्पिंदर .जी. भाटिया यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

शुभम पेडामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here