महाड तालुका क्रीडा मंडळाने केले कबड्डी स्पर्धेचे आयोजन

 

लोकदर्शन 👉शुभम पेडामकर

तामिळनाडूमध्ये उगम झालेला कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे. सात खेळाडू आणि त्यांची खेळाडूंवृत्ती त्यांना विजयाची पताका पडकवण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळेच या कबड्डी स्पर्धेत जास्तीत जास्त कबड्डीप्रेमी सहभागी व्हावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रोळी पश्चिम येथील महाड तालुका क्रीडा मंडळाने आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते . स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता . दिनांक 24, 25 आणि 26 असे सलग तीन दिवस कबड्डीचे सामने महाड तालुका मंडळाच्या प्रांगणात रंगले .या स्पर्धेसाठी आजी-माजी कमिटीने सहकार्य केले त्याचबरोबर युवा वर्ग सतर्क असून शिस्तबद्ध रित्या कबड्डी स्पर्धा कशी पार पडेल याकडे लक्ष देण्यात आले .

यंदाच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम विजयी संघ- शौर्य क्रीडा मंडळ( सोलमकोंड) महाड विजयी झाला असून त्यांना प्रथम क्रमांक म्हणून रोख रक्कम – ₹ १११११रुपये व भव्य चषक तर उपविजयी संघ- अविनाश क्रीडा मंडळ( घाटकोपर) यांना द्वितीय क्रमांक म्हणून रोख रक्कम – ₹ ८८८८ व भव्य चषक देऊन गौरवण्यात आले . तसेच उपांत्य उपविजय- संघ जय हनुमान क्रीडा मंडळ( विक्रोळी) , उपांत्य उपविजय संघ- झोलाई माता क्रीडा मंडळ( चिपळूण) झाले. त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू – हर्ष जाधव, उत्कृष्ट चढाई पट्टू – दादा मोहिते, उत्कृष्ट पक्कड – संदेश गुडेकर म्हणून गौरवण्यात आले.

शुभम पेडामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here