केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पोषण आहार योजनेत हिरव्या पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश केल्यास अधिक लाभ होईल.

 

लोकदर्शन पवनी👉अशोक.गिरी

पवनी:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत शालेय पोषण आहार योजना संपूर्ण देशात राबविली जाते.परंतु पोषण आहारामध्ये जर हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या यांचा समावेश केल्यास अधिक पोषक घटक या आहारातुन मिळेल हेच उद्दिष्ट ठरवून जर शालेय परिसरातच पोषण बाग निर्माण करुन विविध प्रकारच्या पोषण तत्वांचा आहारात समावेश करता येईल.याच विचारांना चालना व‌ प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण देशात पोषण माह अभियान तसेच माझी परसबाग असे विविधांगी उपक्रम शासन निर्देशानुसार शालेय स्तरावर राबविले जातात.यामध्ये अषित प्राथमिक शाळा पवनी येथील शाळेचा सक्रिय सहभाग राहिला.शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या मार्गदर्शनात उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी‌ यांच्या संकल्पनेतून आदर्श परसबाग निर्माण करण्यात आली.प्रथमत: केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख व्ही.ए.नान्हे यांनी परसबाग मुल्यांकन करून मार्गदर्शन केले यामध्ये विविध नाविन्यता निर्माण करुन आदर्श परसबाग निर्माण केली.नुकतेच‌ तालुका स्तरीय पथक टिमचे प्रमुख विस्तार अधिकारी एन.टी.टीचकुले यांच्यासह भुयार केंद्र प्रमुख व्ही.ए.नान्हे, कृषी अधिकारी कार्तिक नखाते, समिती सदस्य अशोक पारधी, बालविकास प्रकल्प अधिकारी जे.के.पुराम‌ आदी मान्यवरांनी परसबागेला भेट देऊन प्रत्यक्ष मुल्यांकन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने,पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे,ए.आर.गिरी, सुप्रिया रामटेके, धनश्री मुंडले, प्रमिला बिसने तथा शालेय विद्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here