विद्यार्थी भारतीच्या “भेदाभेद मुक्त मानव” मोहिमेची २ री वर्षपूर्ती..पुण्यातील चिखलगावात. 26 जानेवारी 2023 “प्रजासत्ताक दिन” ते 30 जानेवारी 2023 “गांधी शहादत दिन”

 

लोकदर्शन 👉 श्र्वेता पाटील

“विद्यार्थी भारती” संघटनेने हाती घेतलेले *”भेदाभेद मुक्त मानव मोहीम”* बघता बघता दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचली आहे.आज मानवाने आपले अस्तित्व चंद्रापर्यंत न्हेले असले तरी जगण्याच्या व्यासंगाला रूढी परंपराच्या बेढ्यानी खूप वाईट पध्दतीने जखडले आहे हे सत्य आज 21 व्या शतकातही नाकारता येणं अशक्यच आहे. आज भेदभाव मुळापासून संपवणे जवळपास अशक्यच असले. तरी मुळापासून माणुसकी संपणे हेदेखील अशक्यच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही . ह्याच मानवतेच्या विश्वासावर ही मोहीम 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिन ते 30 जानेवारी 2021 गांधी शहादत दिन विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी 5 दिवसाचे उपोषण करून साताऱ्यातील वाई तालुक्यातील बोपरडी या गावातून सुरू केली होती . आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन एक दिवसीय लक्षणीक उपोषण करून त्या गावात मानवतेची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे व आता पर्यंत एकूण 24 उपोषणे झाली आहेत.अशी माहीती विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा पूजा गणाई यांनी दिली..

हे उपोषण सरकार कडून कोणत्याही अपेक्षा ठेवत नाही कारण कागदोपत्री कायदा करून कोणताच भेद संपत नाही.भेद संपवण्यासाठी माणसांची वृत्ती बदलावी लागेल. आणि ती हळूहळू बदलेल. उपोषण हा फक्त अहिंसेचा एक मार्ग आहे जो आम्ही अवलंबिला आहे. भेदभाव तेव्हा संपेल जेव्हा मानवी प्रवृत्ती बदलेल, माणसाला माणूस म्हणून बघितले जाईल त्यासाठीच गावोगावी ,खेड्यापाड्यात जाऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो ज्यात संपूर्ण गाव सहभागी होतो.मग त्यात सामुहिक हळदीकुंकू, वेगवेगळे खेळ, स्पर्धा इत्यादी.अशी माहिती कल्याण समनव्यक दिव्या सनान्से यांनी दिली.

या वर्षी पुण्यातील भोर तालुक्यातील चिखलगावात हे पाच दिवसाचे उपक्रम राबविण्यात येत आहे आपणही जमेल तसा वेळ काढून पाठिंबा द्यायला नक्की या!

आधी माहितीसाठी
8104571787

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here