तूर, हरभरा खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा… तालुका दबाव गटाचे सहाय्यक निबंधकांना निवेदन

लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी

तूर, हरभरा पिकांची ऑनलाईन नोंदणी खरेदी सुरू करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सेलू येथील सहाय्यक निबंधक (सहकार )यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांची रब्बी हंगामातील तूर, हरभरा ई-पिके विक्रीसाठी येणार आहेत.शासनाने हमी भाव ठरवून दिलेले आहेत. मात्र बाजारामध्ये शासकीय खरेदी केंद्र चालू नसल्याने व्यापारी अडचणीत असलेल्या शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करून सर्रासपणे हमी भावापेक्षा कमी दराने तूर, हरभरा खरेदी करीत असून त्यावर बाजार समितीचे कसल्याही प्रकारे नियंत्रण दिसत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. नाही.शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शासनातर्फे अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कसल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. तूर, हरभरा ई. पिकांची ऑनलाईन खरेदीबाबत तात्काळ नोंदणी प्रक्रिया सुरु करणे जरूरीचे आहे. तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून जिल्हयात सर्व बाजार समित्यांमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत. तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पोळ, नारायण पवार, मुकुंद टेकाळे, इसाक पटेल, अँड.दळवे, अँड. उमेश काष्टे, आबासाहेब भुजबळ, दिलीप मगर, रामचंद्र कांबळे, दत्तराव कांगणे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र आघाव, राजेंद्र केवारे, अजित मंडलिक, केशव डोईफोडे, उध्दव सोळंके, हरिभाऊ डोईफोडे, रौफ भाई, दत्ता गायके, सतिश काकडे, अंबादास काकडे, अ‍ॅड. योगेश सुर्यवंशी यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here