RTO कार्यालयातर्फे अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

by : Shankar Tadas

*गडचांदूर, वरोरा, ब्रम्हपुरी, चिमुर, गडचांदूर व गोंडपिंपरीचा समावेश

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरीता वरोरा, ब्रम्हपुरी, चिमुर, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दि. 20 जानेवारी 2023 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 23 जानेवारी रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 24 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, *30 जानेवारी रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर* व 31 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या 16 तारखेला वरील दिलेल्या शिबिराचे ऑनलाइन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येतील याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. #RTOChandrapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here