महिलांनो, मतभेद-पक्षभेद टाळा, आत्मनिर्भर बना ! – संगिता धोटे – बिबी येथे सावित्रीबाई महिला बचत गटाचा आनंद मेळावा

लोकदर्शन कोरपना :👉अविनाश पोईनकर

आपआपसातील मतभेद, पक्षभेद यामुळे महिला संघटन होत नाही. महिलांनी एकत्र येवून समाजाला दिशादर्शक काम केले पाहीजे. मतभेद, पक्षभेद टाळून आत्मनिर्भर झाले पाहिजे असे प्रतिपादन मार्डा येथील कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या संगिता धोटे यांनी केले. सावित्रीबाई महिला बचत गट आयोजित बिबी येथे महिला आनंद मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बचत गट अध्यक्षा सुनिता पावडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य सविता काळे, सरपंच माधुरी टेकाम, अरुणा बुच्चे, दुर्गा पेंदोर, सुनिता शिडाम, वर्षा मडावी, सलमा पठाण उपस्थित होते.

मकर संक्रांती निमीत्त गावातील १५० महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम सामुहिक साजरा केला. सावित्रीबाई बचत गटातर्फे महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात माया अहिरकर, प्रतिभा पावडे, पुजा ढवस यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा खोके तर संचालन स्नेहल उपरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई महिला बचत गटाच्या सदस्या कुंदा चटप, लता आस्वले, निर्मला गिरटकर, चंद्रकला क्षिरसागर, मीरा बोबडे, माया घुगूल, सुनिता अंदनकर, अल्का पिंगे, इंदू काळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here