माडगुळे येथे विधवा प्रथेला दिली मूठ माती

 

लोकदर्शन माडगूळे ;👉 राहुल खरात

हळदी कुंकू च्या माध्यमातून विधवा महिलांचा सौभाग्य अलंकार देऊन केला सन्मान यावेळी लताताई बोराडे, सुवर्णाताई पाटील ,सरपंच संगीता गवळी, शेटफळे गावचे उपसरपंच विजय देवकर ,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी देशमुख साहेब ,बँक इन्स्पेक्टर संजय देशमुख साहेब, माजी सरपंच संजय विभुते ,विठ्ठल गवळी ,दगडू लिंगडे ,पोलीस पाटील दत्तात्रय क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते. यावेळी विजय देवकर बोलताना म्हणाले की माडगुळे या गावाने दोन साहित्यिक आपल्या देशाला दिलेले आहेत *ग दि माडगूळकर व वेंकटेश माडगूळकर* यांच्या गावांमध्ये आज जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. लताताई बोराडे यांनी महिलांना सक्षम महिला म्हणून उभा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान केले. सुवर्णाताई पाटील यांनी त्यांच्याबाबत झालेल्या अनेक गोष्टींचा या ठिकाणी उलगडा केला आणि महिलांनी धाडसाने पुढे येऊन ज्या महिला आज सौभाग्याचा अलंकार परिधान करणार आहेत त्यांना सर्व गावांनी सहकार्य करावे असे सांगितले यावेळी आभार देशमुख साहेब यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here