राष्ट्रीय युवक दिनी बोरी नवेगाव येथे प्रबोधन

राष्ट्रीय युवक दिनी बोरी नवेगाव येथे प्रबोधन
By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील बोरी नवेगाव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन युवक मंडळ, बोरी नवेगाव यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी लोकदर्शन पोर्टलचे संपादक तसेच श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, चंद्रपूरचे सदस्य शंकर तडस, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनुर्लीचे प्रा. साईनाथ कुंभारे, फार्माशिस्ट शत्रुघ्न मोरे, ग्रामपंचायत सदस्य उमाजी आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व उपस्थितांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट शत्रुघ्न मोरे यांनी आपल्या भाषणातून उलगडला तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग साकार करीत प्रा. साईनाथ कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. युवकांची दशा व दिशा यावर ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे संचालन अंबुजा फाउंडेशनचे आशिष रागीट यांनी तर कार्यक्रम आयोजनासाठी माही ड्रायविंग स्कुलचे आदित्य इटनकर, रुचित भोंगळे यांनी सहकार्य केले. गावातील महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here