मोकाट गुरांमुळे शेतकरी त्रस्त

 

लोकदर्शन 👉नितेश केराम

कोरपना शहरात मोकाट जनावरंचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आलेला माल फस्त केला जात आहे.यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असून जनावरांचे मालक आपले जनावर ताजेतवाने करून घेत आहे आपल्या जनावरला आर्थिक भाव मिळावा मनून बहुतेक वेळा ही जनावरे मोकाट सोडली जातात गाय, म्हैस.दुधाच्या मध्यमातुन पैसा कमवून देतात अशी जनावरेही मोकाट जातात त्रास मात्र परिसरातील शेतकरी व नागरिकांना होत आहे या मोकाट जनावरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचि गरज आहे. मोकाट जनावरांचा कोंडवाड्यात नेले जाते संबधित मालक न आल्यास हरास करण्यात येते त्या वेळी नुकसान झालेल्या व्यक्तीला मात्र कोणताही मोबदला मिळत नाही. या समस्याचि दखल घेऊन नगरपंच्यायत कोरपना यांनी जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोरपना तालुक्याचे पत्रकार व समाज सेवक प्रमोद गिरडकर, दिगंबर भालेराव ,दशरत झाडे ,मधुकर मोडक ,व इतर शेतकरी वर्ग यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here