महिला ग्रामसंघाची बैठक संपन्न पाच महिला बचत गटांना सहा लाख रूपये वाटप

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील श्रीसंत सावता मंगल कार्यालयात महिला ग्रामसंघाची बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकिच्या अध्यक्षस्थानी श्रीमती बावने मँडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसिआएफ सखु पाथरकर, समता ग्रामसंघाच्या अध्यक्षा शिला पाथरकर, सचिव मनिषा गिरी, राधिका लव्हाळे, शिला उबाळे आदी उपस्थित होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सखु पाथरकर, मनिषा गिरी, शिला पाथरकर आदिंनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचारीत्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती बावने मँडम यांनी उपस्थित महिलांना बचत गटाचे महत्त्व सांगितले व महिलांच्या पाच गटांना आलेल्या सिआय एफ सहा लाख रूपये वाटप केले व आलेल्या पैशांचा योग्य विनीयोग करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्येने महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here