Home
Home जिवती श्री. शंकरदेव यात्रेचे उत्साहात उद्घाटन ; जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे यांचा...

श्री. शंकरदेव यात्रेचे उत्साहात उद्घाटन ; जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे यांचा भाविकांशी संवाद.

लोकदर्शन 👉मोहन भारती

जिवती :– महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील कमलापूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री शंकरदेव देवस्थानाच्या यात्रेचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. धार्मिक वातावरणात आणि भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी सुभाषभाऊ धोटे यांनी श्री शंकरजींचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली व आशिर्वाद घेतले. सलग तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देत भाविकांशी संवाद साधला. यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच देवस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिवती काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भिमराव पाटील मडावी, सरपंच नानाजी रामसिडाम, सरपंच सिताराम मडावी, माजी सरपंच सुषमा मडावी, तिरुपती पोले, प्रदीप काळे, अमोल कांबळे, रामेश्वर पोले, दौलत रामसिडाम, पोलीस पाटील भिमराव कोटणाके, देवराव रामसिडाम, सुधाकर नागोसे, डॉ. विजय बन्सोडे यांच्यासह जिवती तालुका व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र–तेलंगणा सीमेवरील हे देवस्थान श्रद्धास्थान मानले जात असून १९६३ पासून स्थापना झाल्यानंतर दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी केली जाते. यंदाही यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here