काँग्रेसचे मोठे नेते भाजपामध्ये दाखल

By : Shankar Tadas

चंद्रपूर :
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील भाजपा महायुती चे अधिकृत उमेदवार मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवार, 1 एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पोहणकर, विजय बल्की आणि रमण डोहे यांनी पक्ष प्रवेश केल. या वेळी मोठ्या संख्येने चंद्रपूर ग्रामीण क्षेत्रातील महिला व पुरुषाची उपस्थित होती. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपा पूर्ण ताकदीने मैदान गजविण्यासाठी सज्ज असून काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा भाजपाप्रवेश निवडणुकीची दिशा बदलणारा ठरू शकतो. आपल्या माणसांकडून प्रसंगी दगाफटका झालाच तर ऐनवेळी गणित बिघडू शकते याची जाणीव भाजपाला आहे. चंद्रपूरचे स्थानिक उमेदवार राजेश बेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. तेली समाजाचे एकूण संख्याबळ आणि प्रभाव लक्षात घेता राजेश बेले यांचा रोडरोलर कोणासाठी मार्ग सुकर करतो याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here