चित्रपट निर्मात्यांना पडली माणिकगड किल्ला ‘साइट’ची भुरळ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕मारोतीगुडा, माणिकगड किल्ला  परिसरात पहिल्यांदाच होतंय अरण्य मराठी चित्रपटांचे चित्रीकरण ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

 

लोकदर्शन गडचांदूर 👉-प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
‘रोल, कॅमेरा, अ‍ॅक्शन’ हे तीन शब्द आता जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांनी अनुभवायला मिळत आहे   चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना आता येथील माणिकगड किल्ला ,मारोतीगुडा या  लोकेशनने भुरळ घातली आहे.
माणिकगड किल्ला ,मारोतीगुडा या गावात  अरण्य या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे

एस एस प्रोडक्शन  कंपनी निर्मित अरण्य या चित्रपटाचे चित्रीकरण जिवती तालुक्यातील मारोतीगुडा आणि माणिकड किल्ला परिसरात पहिल्यांदाच चित्रपट चित्रीकरण होत असून या परिसराला आता नवी ओळख निर्माण होणार आहे .  या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक कलावंतांना या चित्रपटात काम करण्याची संधी निर्माता शरद पाटील आणि अंजली पाटिल यांनी उपलब्ध करून दिली आहे.

तुझ्यात जीव रंगला या सिरीयल चे स्टार हार्दिक जोशी, बिग बॉस स्टार अभिनेत्रीला राधा प्रेम रंगी रंगली सिरीयल स्टार विना जगताप, अभिनेत्री हृतिक पाटील,सैराट चित्रपटातील आर्चीच्या वडिलांच्या भूमिकेत असणारे सुरेश विश्वकर्मा, धर्मवीर चित्रपटात मौदा च्या भूमिकेत असणारे विजय निकम,चेतन चावडा,जनार्धन कदम,अमोल खापरे हे मुख्य भूमिकेत झाडकणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल करंबे यांनी केले असून निर्माता शरद पाटील व अंजली पाटील तामसवाडी गावातील जळगाव जिह्यातील आहेत.

महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती आणि आदिवासी बापाची मुलीच्या शिक्षणासाठी असलेली धडपड. त्यांना होणारा त्रास, समस्या , असा सामाजिक विषय घेऊन चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे.

स्थानिक भागातील कलाकारांना संधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्थानिक जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक ग्रामीण कलाकारांना या चित्रपटात स्थान देण्यात आले असून अनेक भूमिकेत चित्रपटात स्थानिक गावातील ,गडचांदूर शहरातील कलाकारांना स्थान देण्यात आले आहे या माध्यमातून आता या ग्रामीण कलाकारांना सिनेमागृहात ,आणि टीव्ही मोबाईलवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रदर्शित होतांना पाहायला मिळणार आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अतिदुर्गम भागात आदिवासी संस्कृती जोपासली जात असून येथील आदिवासी भागांत चित्रपट शुटिंग झाल्यास  योग्य ती संस्कृती प्रेक्षकांना अनुभवायला मिळावी आणि येथील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशाने हा स्पॉट निवडला आहे .

शरद पाटील – निर्माता अरण्य चित्रपट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *