पवनी येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा.

 

लोकदर्शन पवनी 👉 अशोक.गिरी

पवनी:-४ऑक्टोबर .प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग पंचा उनयत समिती पवनी अंतर्गत सावित्रीबाई फुले कन्या शाळा,पवनी येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धाआयोजित करण्यातआली.कार्यक्रमाचेअध्यक्ष वासुदेव नान्हे वरिष्ठ शिक्षण विस्तारअधिकारी तथा केंद्र प्रमुख पंचायत समिती पवनी तसेच प्रमुख पाहुणे‌ सुजाता गजभिये मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले कन्या शाळा,पवनी तसेच दिपाली बोरीकर,गट समन्वयक,डॉ.मुरलीधर रेहपाडे,विषय साधधव्यक्ती,महेंद्र‌ वाहाने,विषयतज्ञ, रत्नदीप लोणारे, विषयतज्ञ,कैलास शहारे, विशेष शिक्षक,महेंद्र भुरे,विशेष शिक्षक,रिना सावरबांधे डाटा एन्ट्री ऑपरेटर(शापोआ) यांच्या उपस्थित पाककृती स्पर्धा घेण्यात आली.सदर स्पर्धेत एकूण११केंद्रातुन१७ शाळेतील स्वंयपाकी,मदतनीस, पालक सहभागी झाले होते.भरडधान्य व तृणधान्यांचा उपयोग करून गॅसवर,चुलीवर वेगवेगळे पौष्टिक,चविष्ट पदार्थ बनविण्यातआले. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पदार्थांचे परिक्षण करून निकाल जाहीर करण्यातआला.यामध्ये प्रथम क्रमांक साधना मनोज उपथळे,जिल्हा परिषद प्राथ.शाळा आसगाव तर व्दितीय क्रमांक कांचन बाळबुधे जि.प.प्राथ.शाळा कोटलपार तर तृतीय क्रमांक छाया राजु करकाडे,पवन विद्यालय,पवनी यांना घोषित करुन विजेते स्पर्धकांना तसेच इतर सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यातआले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुलेशाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुषा दलाल,साधनव्यक्ती तसेच छायाचित्रन महेंद्र भुरे,विशेष शिक्षक‌ यांनी केले तरआभार प्रदर्शन कैलास शहारे,विशेष शिक्षक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here