इन्फंट च्या फुटबॉल खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लीश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय फुटबॉल किडा स्पर्धेत विजय पटकाविल्याने या संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. सतरा वर्षे वयोगटतेतून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता दहाव्या वर्गातून ओमप्रकाश टोंगे व गीता राजभर, इयत्ता नवव्या वर्गातून इषिता चौधरी तसेच आठव्या वर्गातून हुमान काझी या विदयार्थ्यांचा समावेश आहे.
विदयार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापक रफीक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुडलिक वाघमारे, शुभम बन्नेवार, हर्बल क्षीरसागर आदिंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here