फ्रेंड्स ऑफ नेचर तर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आले फुलपाखरू विषयी माहिती

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १ बिग बटरफ्लाय मंथ २०२३ निमित्ताने या फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) चिरनेर उरण रायगड महाराष्ट्र तर्फे आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये फुलपाखरांविषयी माहिती सांगण्यात आली. फुलपाखरांची ओळख त्यांचे जीवनचक्र त्यांचे महत्त्व, आपल्या परिसरातील फुलपाखरांच्या प्रजातीची माहिती, फुलपाखरांच्या विषयी आकर्षक तथ्ये, फुलपाखराचे स्थलांतर व त्यांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने कसा केला जातो ह्या सर्वां विषयी माहिती संस्थेचे सदस्य कु.निकेतन रमेश ठाकूर यांनी केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे अविनाश गावंड व हृषिकेश म्हात्रे हे हजर होते. रामचंद्र म्हात्रे विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर व शिक्षक निवास गावंड,देवेश म्हात्रे व इतर शिक्षक वृंदाचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here