गडचांदूर नगर परिषदेच्या सभापतींची अविरोध निवड ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नगरपरिषद गडचांदूर मध्ये आज पार पडलेल्या सभापतीच्या निवडणुकीमध्ये बांधकाम सभापती पदी मीनाक्षी एकरे, आरोग्य व स्वच्छता सभापती विक्रम येरणे, महिला व बालकल्याण सभापती जयश्री ताकसांडे, उपसभापती रजिया सुलताना शेख ख्वाजा तर उपाध्यक्ष शरद जोगी यांची पदसिद्ध शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती म्हणून अविरोध निवड झाली.
विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र वाकलेकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी काम पाहिले. नगरपरिषद मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची बहुमतात सत्ता आहे. यावेळी नगराध्यक्ष सविता टेकाम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या कल्पना निमजे, काँग्रेसचे गटनेते विक्रम येरणे, शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार, स्वीकृत सदस्य पापय्या पोनमवार, विजय ठाकुरवार, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, किरण अहिरकर, अश्विनी कांबळे, शेख सरवर, वैशाली गोरे, सुनीता कोडापे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here