महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदुर :-महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व सलग्निक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्या आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन, सातवा वेतन आयोगाचा आजपर्यंतचा फरक, याबाबतच्या शासन विरोधी धोरणाच्या विरोधात कृती समितीच्या आदेशानुसार गडचांदुर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयासमोर बेमुदत संपावर गेले आहेत, महाविद्यालयीन कामकाज बंद करून सहभागी झाले आहे.
त्यामुळे महाविद्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले होते.
शासनाच्या कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत सदर मागणीचे जीआर लेखी स्वरूपात निघणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहील. आणि मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे,

या बेमुदत संपात महाविद्यालयाचे कर्मचारी सुभाष गोरे,शुभकांत शेरकी, प्रशिक करमनकर,संजय पिंपळकर,कुमारी शबाना शेख,प्रवीण शेख,गुलाब सुयोग खोब्रागडे, बबन पोटे,यशवंत मांडवकर, भास्कर मेश्राम, अरुण मेंढी,रुपेश मेश्राम, शिवशंकर दुबे,रमेश मांडवकर, सहभागी झाले आहेत,
प्राचार्य रामकृष्ण पटले,व इतरांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here