इन्फंट कॉन्व्हेंट येथे शिवजयंतीचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीचे आयोजन उत्साहात पार पडले. इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, गीत, नृत्य, वेशभूषा, वक्तृत्व सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, उमेश लढी, विद्या चौधरी, वैशाली धानोरकर, सुभाष पिंपळकर यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भुमी खडाव तर आभार प्रदर्शन शृती साळवे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here