आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– जल जीवन मिशन २०२२ – २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत ४६ लक्ष ६७ हजार रुपये आणि जन सुविधा योजनेतून २०२२ – २०२३ अंतर्गत स्मशान भूमी शेड व पोच रस्त्याचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत १० लक्ष रुपये या सर्व विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा सिंधी येथे बैठक घेऊन आ. धोटे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, गावातली समस्या जाणून घेतल्या, समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते तथा माजी सभापती आबाजी पा ढुमणे, सरपंच सौ शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ट अभियंता सतीश खोब्रागडे, विस्तार अधिकारी रत्नपारखी, विरुर स्टेशन चे सरपंच अनिल आलाम, नलफडी चे सरपंच अमित टेकाम, आक्केवारजी, अजित सिंग टाकं, श्रीधर झुरमुरे, दशरथ पा. मोरे, दाऊजी ठेंगरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोडापे, गुलाब चाहरे, उज्वला दामेलवार, सोमबाई सिडाम, गीताबाई धानोरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीमती सुनिताबाई सोयाम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश घुबडे, राजकुमार दामेलवार, मंगेश रायपल्ले, संजय ढुमणे, ग्राम सेविका योगिता चिताळे, गुलाब पा. धानोरकर, रवींद्र चद्रांगडे, महादेव पा. वैरागडे, माधव पा. पिंगे, निलकंठ पा. धानोरकर यासह सिंधी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here