*जि.प.उच्च प्राथ.शाळा तळोधी येथे शिवजयंती साजरी*

 

लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळोधी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली,
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला शाळेचे मुख्याध्यापक रामू गावंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .याप्रसंगी शाळेतील शिक्षक संतोष जुनगरी,अजित साव,कांतीलाल चव्हाण तसेच विद्यार्थी यांनी सुद्धा अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती सांगितली.संतोष जुनगरी यांनी गनिमी कावा, आरमार दल याबद्दल माहिती दिली.कांतीलाल चव्हाण यांनी जिजाऊ माता यांनी बाल शिवाजी कसा घडविला सांगितले.अजित साव यांनी शिवरायांचा आदर्श घेऊन आपली प्रगती करावी असे आवाहन केले.डॉली खेवले या विद्यार्थिनीने शिवाजी महाराज यांची माहिती सांगितली.कार्यक्रमाचे संचालन सृष्टी कुंभारे तर आभार प्रतिक कांबळे या विद्यार्थांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय मंत्रिमंडळने सहकार्य केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here