आसन खुर्द येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

by : Shankar Tadas

कोरपना : जलजीवन मिशन  अंतर्गत कढोली खुर्द ग्रामपंचायत करिता आसन खुर्द येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या योजनेतून बोरी नवेगाव आणि आसन खुर्द येथे जलकुंभ उभारून पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामाकरिता 95 लाख रुपये खर्च मंजूर आहे. कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निर्मलाताई मरस्कोल्हे यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक विलास चव्हाण, शासकीय कंत्राटदार राजू तांबेकर,आसन खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य भास्कर मत्ते, पत्रकार शंकर तडस, मधुकरजी वडस्कर, जगनजी दरेकर, कवडूजी मरस्कोल्हे, संजय आस्वले, सुरेश रणदिवे, अविनाश पेटकर, अक्षय ढेंगळे, चंदु पवार, उद्धवजी पायघन,कार्तिक बावणे, सागर मत्ते, पाणीपुरवठा कर्मचारी  प्रभाकर सोनटक्के तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#kadholikhurd #Korpana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here