पिरकोनमध्ये साई भंडारा उत्साहात साजरा.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 12( दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवार दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी उरण तालुक्यातील क. भा. पाटील विद्यालय,पिरकोन येथे श्री सत्यनारायणाची महापूजा व श्री साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. साई सेवक कृष्णा पाटील यांच्या तर्फे अन्नदान करण्यात आले.भाविक भक्तांनी दर्शन घेउन या महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व साई सेवक, ग्रामस्थ मंडळ पिरकोन यांनी विशेष मेहनत घेतली.काकड आरती, अभिषेक, साई चरित्र वाचन, मध्यान्ह आरती, हळदी कुंकू, तसेच हरिपाठ, धूपारती, सायंकाळी 7 वा. महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी गावचे प्रथम नागरिक नवनिर्वाचित सरपंच कलावती पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here