हस्ताक्षर स्पर्धेत अंजली व दीपाली राठोड चे सुयश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

3जे क्लब द्वारा आयोजित कै. उषा विष्णू देशपांडे स्मृति निमित्य आयोजित वर्ग 7,8 आणि 9 च्या विद्यार्थ्यासाठी हस्ताक्षर स्पर्धा 2023 मध्ये एम.के.एच. संचेती शाळेतील इयत्ता सातवित शिकणारी विद्यार्थीनी कु. अंजली श्रीपत राठोड प्रथम तर इयत्ता आठव्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु. दिपाली राठोडला प्रोत्साहनपर निवड करून दिनांक : 11फेबुवारी 2023 हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड येथील एम.के. एच. संचेति पब्लीक स्कूलच्या नारायणी मेमोरियल हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करुन बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणा नंतर प्रहार समाज जागृती संस्था द्वारा चालवित असलेल्या देश कल्याणकारी विविध उपक्रमाचे अप्रतिम सादरीकरण व संस्था सचिव फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, शाळेच्या मुख्याधिपिका आणि विशेष सैनिकी प्रशिक्षण प्रमुख यांच्या मुलाखती, मनोगत, अनुभव कथनातून संवादात्मक पद्धतीने शाळेची सुरुवातीपासूनच्या सर्व घडामोडी व विशेषतावर केंद्रीत कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन संचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री. मुकूंद देशपांडे आणि सौ. मेघना देशपांडे यांनी यशस्वीरित्या पार पाडले. शेवटी वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here