काळामाथा यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या ऑटोला अपघात

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव
औरंगाबाद- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जउळका रेल्वे नजीक दुचाकी व ऑटो दरम्यान झालेल्या अपघातात तालुक्यातील खेरखेडा येथील तिन जण गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना  ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी वाशीम व तेथुन अकोला येथे पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील काळामाथा येथील अवलीया महाराज संस्थानचे वतीने यात्रा महोत्सवाच्या सांगता निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा महोत्सवानिमित्त दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील खैरखेडा येथील काही व्यक्ती गेले होते. महाप्रसाद आटोपल्या नंतर काळा माथा येथुन घराकडे परत येत असताना खेरखेडा येथील तिन चाकी पिकअप ऑटो क्रमांक एम एच ३०पी ६६२० व दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एच ३७ ए. सि. २८४३ ची जबर धडक झाली. या मध्ये अॅटो मधिल तिनं प्रवाशी गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसां सह १०८ रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर जखमींना उपचारासाठी वाशीम येथे हलविण्यात आले तेथुन काही जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here