*२६ जानेवारी निमित्त २०० मुलांना खाऊ वाटप आणि वृक्षारोपण*

 

लोकदर्शन 👉 -गुरुनाथ तिरपणकर

२६जाने.प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणच्या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री , संपादिका समाजसेविका, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था ,कल्याण तालुका अध्यक्षा अनिता प्रविण कळसकर यांनी शशांक बालविहार या कल्याण पश्चिम च्या शाळेत दोनशे विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले तसेच शाळेला सोनचाफा आणि फुलांची झाडे भेट म्हणून दिले . शिवाय नेफडोच्या अंतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले . अनिता कळसकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिल्या.

*अनिता प्रविण कळसकर* *कल्याण तालुका अध्यक्षा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here