अंबुजा फाऊडेशन उपरवाही येथील कौशल्य विकास केंद्राला आमदार सुभाष धोटे यांची भेट*

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :–
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील अंबुजा सिमेंट कंपनी व्यवस्थापन कडून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्थुत्य असे उपक्रम राबविले जातात. अंबुजा फाऊंडेशनचे उपरवाही स्थित कौशल्य विकास केन्द्र सुरु आहे. कौशल्य केंद्राला दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन तेथील उपक्रमाचे पाहणी करून कौतुक केले.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील अंबुजा सिमेंट कंपनी क्षेत्रातील ग्रामपंचायतच्या विकासासाठी कंपनीचे व्यवस्थापक सुब्बू लक्ष्मण यांच्याशी चर्चा करून परिसरातील गावांचा सामाजिक दायित्व निधीमधून विकास करावा अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी व्यवस्थापकांना दिल्या. या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अंबुजा फाउंडेशनचे श्रीकांत कुंभारे, कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य प्रमोद खडसे, परिसरातील भेंडवी चे सरपंच शामराव कोटनाके, सोनापूरचे सरपंच जंगु पा. येडमे, ऊपरवाहीचे सरपंच अश्विनी सिडाम, हरदोना सरपंच सगुणा मेश्राम लखमापूर सरपंच बैठकीला कोरपना तालुका काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष विठ्ठल थिपे, अंबुजा सिमेंट कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, उपरवाही ग्रामपंचायतचे उपसरपंच बलकी, एकनाथ मुट्ठलकर, उपसरपंच रणदिवे अरुण शेडमाके तसेच परिसरातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सचिव उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी अनेक समस्या आमदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. कंपनी व्यवस्थापनाच्या अखत्यारीत असलेल्या परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here