आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कवठाळा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– श्रीराम क्रीडा मंडळ कवठाळा द्वारा सर्वर यांचे भव्य पटांगण येथे दि. २८, २९, ३० जानेवारी २०२३ दरम्यान दिवस – रात्र पाळीत तीन दिवसीय कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आ. धोटे यांनी तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या व कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम कौशल्य आत्मसात करून खेळाडूंनी गौरव प्राप्त करावे तसेच नवयुवकांनी अशा मैदानी खेळांसाठी वेळ द्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक अरुणभाऊ निमजे, कवठाळा चे सरपंच रुपाली बोबडे, माजी सरपंच रामदास कोहळे, उपसरपंच गणेश रोगे, ग्रा. प. सदस्य भारत दुतकोरे, अमोल कोडापे, मारोती आगलावे, देवराव ठावरी, मारोती राऊत, पोलीस पाटील बंडू चौधरी, मिननाथ बोबडे, तमुस अध्यक्ष मधुकर निब्रड, शरद वरारकर भाऊराव आगलावे ,वंदना सोयाम साईनाथ सरोदे, हरिभाऊ जेनेकर, सतीश आगलावे यासह कवठाळा व परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here