जिजामाता विद्यालयात क्रीडा सप्ताह

by : Ajay Gayakwad

वाशिम /मालेगाव

विद्यालयात क्रीडा सप्ताह आयोजित करून,सुवर्णपदक,रजतपद, काश्यपदक राज्यस्तरीय स्पर्धेसारखे जवळपास 270 विद्यार्थ्यांना वितरित करणे हा जिजामाता विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य नाना मुंदडा विद्यालय तथा राज्य सदष्य मराठा सेवा संघ वसंतराव अवचार यांनी जिजामाता विद्यालय पांगरी नवघरे येथे क्रीडास्पर्धेच्या बक्षीस वितरणात केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राधेश्याम घुगे तर प्रमुख उपस्थितीत माजी प्राचार्य राजूरकर विद्यालय मारोती बळी ,पोलीस पाटील संदीप नवघरे,कबड्डी असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष रामभाऊ नवघरे क्रीडाशिक्षक विलास खराटे होते.
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाउ चे पूजन घेऊन विद्यालयातील 270 विद्यार्थ्यांना ,सुवर्णपदक, रजतपदक,काश्यपदक वितरित करण्यात आले.सुवर्णपदक वनपरिक्षेत्र अधिकारी मेघा गुडंकवार,रुजतपदक पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे,तर काश्यपदक सरपंच डिगंबर खाडे यांनी प्रायोजकत्व घेतले .यावेळी प्राचार्य घुगे,बळी यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक विलास खराटे,नवनाथ मुठाळ,प्रा.गोकुळ राठोड, प्रा.संतोष वाझुळकर,प्रा.पंकज इश्वरे,परमेश्वर वाळूकर,रामेश्वर मानवताकर,गणेश बाजड,रवी जंजाळकर, वैशाली धंदरे, चुणीलाल जाधव शिक्षकेतर अनंत जहागीरदार,संदीप देशमुख, बळीराम नवघरे,मोहन शिरसाट,नितेश हजारे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाझुळकर यांनी तर आभार प्रदर्शन उमेश लहाने यांनी केले.

#jijamatavidyalay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here