स्वतः च्या मुलीचे लग्नात पाच सामूहिक विवाह संपन्न दाग दागिने व संसार उपयोगी वस्तू दिल्या **♦️मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री हाजी शफीकअली खान याचा पुढाकार**

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

येथील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री हाजी शफीक अली खान रफिक अलिखान यांनी आपली मुलगी
बिबी महेनुर हीचा परभणी येथील महाराष्ट्र युवक काँग्रेस माजी सरचिटणीस श्री इरफान उर रहेंमान खान याचा मुलगा
फतिख अझान खान याच्या सोबत पाच गरीब मुलीचे विवाह करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की दिनाक 13/01/2023 रोजी सेलू येथील बाहेती मंगल कार्यलय येथे सायं 5 वाजता शाही विवाह समारोह करण्यात आला या मध्ये तीन मुलीला पित्याचे छत्र नव्हते , व दोन मुली आर्थिक दुर्बल व रोज मजुरी करणारे होते अश्या एकूण पाच मुलीला आपल्या स्वतः च्या मुलीच्या लग्न मंडप मध्ये लग्न लावून देण्याचा पुढाकार हाजी शफीक अली खान यांनी घेतला या विवाह चे धार्मिक रित्या खुतबा पठण मौलना तज्जुमल अहमद कास्मी यांनी केले या पाच मुली ना संसार उपयोगी वस्तू ,तीन ग्रॅम सोने दागिने, श्रगार साहित्य , पलग, गादी, कपाट,पाच ड्रेस दिले गेले विवाह ठिकाणी होती की समाजातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तींनी असा कार्यक्रम पुढाकार घेऊन गरीब व अनाथ कुटूबाला आधार होईल अशी चर्चा होती असे कार्य केल्या बद्दल हाजी शफीक अलि याचे अभिंनदन केले आहे
या विवाह समारोह मध्ये आमदार श्री बाबाजानी दुराणी,साईबाबा नागरिक बँकेचे अध्यक्ष श्री हेमत आडळकर, युवा नेत्या सौ प्रेक्षा भाबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक काकडे,श्री राजेंद्र लहाने,माजी नगराध्यक्ष श्री पवनआडळकर,सेलू भूषण श्री जय प्रकाश बिहानी,उद्योजक श्री वल्लभ सेठ लोया,राजेश गुप्ता,इत्यादी नातेवाईक ,शहरातील प्रतष्ठित नागरिक,पत्रकार,डॉक्टर,वकील,उद्योजक,शेतकरी ,व्यापारी याच्या उपस्थित पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगर सेवक श्री उरुज लाला,हाजी आलिषेर खान,इम्रान खान,
मेहराज खान,सोहेल खान, शहेजाद खान व मित्र परिवार ने परिश्रम घेतले विवाह कार्यक्रम चे सूत्र संचालन मौलाना सादिक
नदवी यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here