भारत जोडो यात्रेदरम्यान अत्यंत दुःखद घटना

by : Shankar Tadas

जालंधर /पंजाब

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अत्यन्त दुःखद घटना घडली आहे. खासदार संतोख चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 14 जानेवारी रोजी भारत जोडो यात्रा थांबवण्यात आली आहे. राहुल गांधींसह सर्व नेते खासदारांच्या घराकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या थंडीच्या मोसमात हृदयाच्या आरोग्याच्या गुंतागुंतीबाबत आरोग्य तज्ज्ञ आधीच इशारा देत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयविकाराचा झटका-स्ट्रोकचा धोका वाढतो. खासदार संतोख सिंह यांच्या हृदयाचे ठोके प्रवासादरम्यान अचानक वाढले होते. त्यांना रुग्णालयात हलविले असता मृत घोषित करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here