स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची जबाबदारी युवकांची : माजी आमदार संजय धोटे

By : Satish Musle

राजुरा : संपूर्ण भारतभर योध्दा संन्यासी, संघर्षपुरुष ,युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच हिंदवी स्वराज्याचे  स्वप्न ज्यांच्या कुशित साकार झाले अशा स्वराज्य जननी राजमाता  जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त राजुरा येथे स्व.यादवराव धोटे स्मृती महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुगामी लोकराज्य महाअभियान व संजय धोटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय धोटे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची जबाबदारी युवकांवर असुन स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या जिवनकार्याचे अनुकरण करा, असे आवाहन त्यांनी केले.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे , सस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे,अनुगामी लोकराज्य महाअभियान राजुरा भाग समन्वयक सतिश मुसळे ,अँड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालयच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्ररवार मॅडम व विद्यार्थी ,विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल आईलसिंघानिया यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गोविंद झाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here