वालूर येथे नखाते आश्रमशाळेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार

 

लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी

वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्याम मचाले हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून दंत रोगतज्ञ डॉ संगीता कटारे , रंगनाथ सोनवणे , सुनील आबूज,संजय वाशिंबे , गोविंद केंद्रे,वंदना चौधरी,सविता शेळके यांची उपस्थिती होती.याप्रसंगी इयत्ता ५ ,वी मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक सोनाली रंगनाथ सोनवणे ,शिवम सुनील आबुज यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या विद्यार्थ्यांना गणेश रेडेवाड ,गडम निलेश व श्रीमती मीना फंड या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते,सचिव भावनाताई नखाते,संचालक अजिंक्यभैया नखाते,सहाय्य्क आयुक्त गीता गुठ्ठे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,प्राचार्य रमेश नखाते मुख्याध्यापक श्याम मचाले उपमुख्याध्यापक संजय वाशिंबे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन निलेश गडम यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटोळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here