पत्रकार शंकर चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कार

By :  Shankar Tadas

कोरपना :
पत्रकार दिनानिमित्त राजुरा पत्रकार संघातर्फे राजुरा येथे ज्येष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्काराने जिवती तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक पुण्यनगरी आणि लोकदर्शन पोर्टलचे प्रतिनिधी शंकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. राजुरा मतदार संघाचे आमदार आणि गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  यावेळी माजी आमदार वामनराव चटप,  माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजयभाऊ धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अविनाशजी जाधव, पत्रकार संघाचे सल्लागार उमाकांत धोटे,  पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बोर्डेवार, सचिव अनिल बाळसराफ  व राजुरा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सत्कार मूर्ती प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा. विजय आकनूरवार आणि कोरपनाचे लोकमत प्रतिनिधी जयंत जेणेकर यांनाही पत्रकार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here