इन्फंट कॉन्व्हेंट येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात.

लोकदर्शन 👉.मोहन भारती

राजुरा  :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता दुसरीची विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा घंटेवार हीने एकपात्री अभिनयाद्वारे स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता पहिली चा विद्यार्थी सम्यक फुलझेले ने आपल्या विचारातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धाही घेण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, वर्ग शिक्षक सोएब शेख यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हितेश जयपूरकर ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here