राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने गरजूंना अन्नदान.

0
92

By : Mohan Bharti

उपक्रमाचा आज सहावा दिवस.

राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत गरजूंना अन्नदान वितरित करण्यात आले. या उपक्रमाचा आजचा हा सहावा दिवस आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, नगरसेवक हरजितसिंग संधू, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, तालुकाध्यक्षा कविता उपरे, माजी नगरसेविका मिना लांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, रामनगर काँग्रेस अध्यक्ष पुनम गिरसाळवे, महिला कार्याध्यक्ष शुभांगी खामनकर, जवाहर नगर काँग्रेस उपाध्यक्ष योगिता मटाले, शहराध्यक्ष अशोक राव, हेमंत झाडे, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, सारंग गिरसाळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here