डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या संस्‍थेला ८ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर व ५० हजार मास्‍क चे वितरण


By ÷Shivaji Selokar
*⭕समाजभान जोपासत कार्य करणा-या सेवाभावी संस्‍थांना मदत करणे महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार*

डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर सारख्‍या सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन वनवासी व दुर्गम भागात आरोग्‍य सेवा दिली जाते. समाजभान जोपासत कार्य करणा-या अशा सेवाभावी संस्‍थांना ८ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर व ५० हजार मास्‍क आम्‍ही वितरीत केले. या माध्‍यमातुन कोरोनाच्‍या लढाईत योगदान देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. गेल्‍या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन सेवाकार्य अव्‍याहतपणे सुरू आहे. ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर साठी आमचे नेते श्री. नितीनजी गडकरी यांचे लाभलेले सहकार्य आमच्‍यासाठी लाखमोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १८ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या संस्‍थेला ८ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर व ५० हजार मास्‍क वितरीत केले. यावेळी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरचे अध्‍यक्ष वसंतराव थोटे, सचिव अॅड. आशिष धर्मपूरीवार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर ही संस्‍था सन १९८० पासून वनवासी क्षेत्रात आरोग्‍य व शैक्षणिक विषयक कार्य करीत आहे. वनवासी क्षेत्रात वसतीगृह, फिरते चिकीत्‍सालय या संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन कार्यरत आहे. अशा सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन वनवासी भागात आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करण्‍याला हातभार लागणे महत्‍वाचे आहे, असे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

याआधीही आम्‍ही ना. नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेटीलेटर्स, १५ मोठेव्‍हेटीलेटर्स, चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर, पोंभुर्णा साठी ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध केले. आमदार निधीतुन बल्‍लारपूर नगर परिषदेला २ रूग्‍णवाहीका उपलब्‍ध केल्‍या. १०० पीपीई किट, ७० चश्‍मे वितरीत केले. बल्‍लारपूर शहरातील २०० भाजीपाला विक्रेत्‍यांना फेसशिल्‍डसह जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स वितरीत केल्‍या. कोविड काळात रूग्‍णांना ने-आण करण्‍यासाठी ५ रूग्‍णवाहीकांची सेवा निःशुल्‍क सुरू केली. १५० च्‍या वर ऑटोमेटीक सॅनिटायझर मशीनचे वितरण केले. नुकतेच या मशीनसाठी सॅनिटायझर सुध्‍दा वितरीत केले. मास्‍क व फेसशिल्‍डचे वितरण केले. चंद्रपूर महानगराला १५ व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागाला ५ असे २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर त्‍यांनी वितरीत केले. यापुढील काळातही कोरोनाच्‍या लढाईत भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आपल्‍या परिने आमचे सेवाकार्य सुरूच राहील, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *