आमदार सुभाष धोटे यांनी घेतला वेकोलीच्या क्षेत्रीय रुग्णालयाचा आढावा.

By : Mohan Bharti

दोन दिवसांत सुरू होणार ५० रुग्ण क्षमतेचे कोरोना केअर सेंटर आणि १० आॅक्सिजन बेड युक्त सेंटर. तर भविष्यात आनखी १० आॅक्सिजन बेड सुरू करण्यासाठी प्रशासन करणार तयारी.

राजुरा : वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या क्षेत्रीय रुग्णालय, धोपटाळा टाऊनशीप येथे आज आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेतला. येथे ५० रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड युक्त सेंटर तातडीने सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आमदार सुभाष धोटे यांच्या सुचनेनुसार वेकोली प्रशासनाने दोन दिवसांत १० आॅक्सिजन बेड आणि ५० रुग्ण क्षमतेचे कोरोना केअर सेंटर आणि सुविधा सुरू करण्याचे मान्य केले तर येणाऱ्या काळात येथे आनखी १० आॅक्सिजन बेड सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक डे आणि क्षेत्रीय रुग्णालयाचे मेडिकल आॅफीसर डॉ. ओबश अली यांनी मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर आजपासूनच या कामाला येथील आरोग्य प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापन कामाला लागले आहेत.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार हरीश गाडे, मेडिकल आॅफीसर प्रकाश नगराडे, कामगार नेते शंकर दास, बंडू लांडे, नागेश मेदर, आर. आर. यादव, विजय कानकाटे, अनंत ऐकडे, अमोल घटे, सरपंच राजू पिंपळशेंडे, पत्रकार एम के शेलोटे, पत्रकार प्रा. प्रफुल्ल शेंडे, संतोष शेन्डे, जगदीश बुटले, कोमल पुसाटे, संगीता हिवराळे, शीला टाले, ब्रिजेश जंगीतवार, हारून शेख यासह वेकोली व रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *