लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष, गडचांदूर मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दि. ५ जून २०२६ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान, वार्ड क्र. ५, गडचांदूर येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला गडचांदूर मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद डोहे, संयोजक तथा शहर महामंत्री व नगरसेवक श्री. सतीश बेतावार, सहसंयोजक श्री. गणेशा आदे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मीताई डोहे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिताताई चिताडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. विवेकानंद उरकुडे, नगरसेविका सौ. सपना सेलोकर, नगरसेवक श्री. सुरज पांडे, सौ. अपर्णाताई उपलेंचवार, सौ. जयाताई लोहे, श्री. अरविंद कोरे, श्री. गणपत बुरडकर, श्री. देरकर, श्री. विनोद इंगळे, श्री. देविदास पेंदोर, श्री. सचिन चुरे, सौ. शालिका बेले, सौ. पौर्णिमा आवळे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाची जबाबदारी एका कार्यकर्त्याकडे सोपविण्यात आली. वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विकासकामांना पर्यावरणीय सलामी देत “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला व पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प केला.





