Home
Home मुंबई आमदार देवराव दादा भोंगळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

आमदार देवराव दादा भोंगळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

लोकदर्शन मुंबई 👉मोहन भारती

मुंबई, दि. २६ मे २०२६
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. देवराव दादा भोंगळे यांनी आज मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. कॅबिनेट बैठकीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत विविध विषयांवरील निवेदने मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आली.

यावेळी मतदारसंघातील रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. विविध विकासकामांना गती देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून राजुरा मतदारसंघाच्या development साठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

या भेटीदरम्यान जिल्हा महामंत्री श्री. विवेक बोढे हे उपस्थित होते. त्यांनीही मतदारसंघातील विविध प्रश्न मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

या बैठकीमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here