Home
Home गडचांदूर / कोरपणा CSR निधीतून गडचांदूरच्या विकासाला गती 🔴 प्रलंबित रस्ता बांधकाम पूर्ण

CSR निधीतून गडचांदूरच्या विकासाला गती 🔴 प्रलंबित रस्ता बांधकाम पूर्ण

By : Shankar Tadas
गडचांदूर :

परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी विषय गांभीर्याने घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासन तसेच माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या प्रयत्नांतून कंपनीच्या CSR निधीतून सुमारे ३५० मीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.

प्रभाग क्र. ९ अंतर्गत मुक्तीधाम ते पुरातन हनुमान मंदिर, हनुमान गुढा परिसरातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वास आले असून परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी तसेच धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुरातन बुद्धभूमी, लंगडा मारुती मंदिर, हनुमान गुढा तसेच शनिमंदिर येथे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. विशेषतः शनिवारी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी येथे मोठी वर्दळ असते. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात मुक्तीधाम परिसरात जाणेही कठीण होत होते.

परिसरातील नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी विषय गांभीर्याने घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासन तसेच माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या प्रयत्नांतून कंपनीच्या CSR निधीतून सुमारे ३५० मीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.

या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची समस्या दूर झाली असून शहराच्या विकासाला नवी गती मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबतच धार्मिक व सामाजिकदृष्ट्याही या रस्त्याचे मोठे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष निलेश ताजने उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी नगर परिषद गडचांदूरचे उपनगराध्यक्ष श्री. संजय मेंढी होते.

प्रमुख उपस्थितीत बांधकाम सभापती श्री. रामसेवक मोरे, पाणीपुरवठा सभापती श्री. शेख सरवर , ईआर हेड श्री. नवीन कौशिक, नगरसेवक श्री. महेश आवारी, श्री. सतीश बेतावार, श्री. चेतन शेंडे, नगरसेविका सौ. सारिका डोर्लीकर, सौ. अश्विनी कांबळे, सौ. मनिषा परचाके, सौ. संगीता गाऊत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच गणमान्य श्री. महादेव एकरे, श्री. महादेव जैस्वाल, श्री. संदीप शेरकी, कुणाल पारखी, सुयोग कोंगरे, मयूर पोटदुखे, इम्रान शेख, राधेश्याम चुट्टे, पराग पोटदुखे, योगेंद्र केवट, श्रीकांत घोरफडे, विक्की मेळावार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षांनी माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने CSR च्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने राबविलेल्या विकासकामांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याची भावना नागरिकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here