Home
Home पुणे महाराष्ट्रासाठी ग्रेस लेडीज ग्लोबलच्या राजदूतपदी डॉ. रिता शेटीया यांची सलग पाचव्यांदा नियुक्ती

महाराष्ट्रासाठी ग्रेस लेडीज ग्लोबलच्या राजदूतपदी डॉ. रिता शेटीया यांची सलग पाचव्यांदा नियुक्ती

लोकदर्श पुणे | 👉रिता शेटीया

यूएसए-नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय संस्था ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या राजदूत (Ambassador) पदी पुण्यातील रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांची सलग पाचव्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संस्थेने हा सन्मान त्यांना बहाल केला आहे.

ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी ही महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास, स्वयंरोजगार, नवोपक्रम आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून, महिलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.

डॉ. रिता शेटीया यांची २०२२ मध्ये प्रथमच महाराष्ट्रासाठी राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती. गेल्या चार वर्षांत त्यांनी महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवत महिलांच्या व्यक्तिमत्व विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या पुढाकारातून पुण्यात “वॉक ऑफ कॉन्फिडन्स”, फेस्टिव्ह इव्हेंट, मानद डॉक्टरेट कार्यक्रम, ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड तसेच ग्लोबल रायटर्स फोरमअंतर्गत विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषयांवर लेखन उपक्रम आयोजित करण्यात आले.

पुण्यातील कलमाडी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या “वॉक ऑफ कॉन्फिडन्स” कार्यक्रमाची नोंद ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.

डॉ. शेटीया यांच्या कार्याची दखल घेत संस्थेच्या संस्थापिका डॉ. सोना पांडे यांनी त्यांना “ग्लोबल लीडर”, “ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड”, “ग्लोबल वूमन आयकॉन अवॉर्ड”, “ग्लोबल रायटर पुरस्कार” तसेच “शी इज ग्लोबल” पुरस्काराने गौरविले आहे. तसेच संस्थेच्या “She is Global” या पुस्तकातही त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

यावेळी डॉ. सोना पांडे म्हणाल्या, “डॉ. रिता शेटीया या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ग्रेस लेडीजचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेतील, असा आम्हाला विश्वास आहे. महिलांना जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.”

डॉ. रिता शेटीया यांनी सांगितले की, “ग्रेस लेडीज संस्था महिलांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यशाळा, ग्लोबल एक्सपोजर, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. महिलांनी आणि तरुणींनी या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा.”

२००९ मध्ये सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या ग्रेस लेडीज ऑर्गनायझेशनमधून विकसित झालेली ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी आज यूएसएमध्ये नोंदणीकृत बिझनेस कॉलेज म्हणून कार्यरत आहे. केवळ पाच महिलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १५ हजारांहून अधिक महिलांचा जागतिक समुदाय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here