श्री हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकदर्शन, बामणवाडा 👉मोहन भारती

ता. राजुरा अंतर्गत मौजा नवीन बेरडी (बामणवाडा) येथे हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त श्री हनुमानजींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमादरम्यान विधीवत पूजा-अर्चना करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी संकटमोचक श्री हनुमानजींच्या चरणी जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, बजरंगबली श्री हनुमानजी हे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक असून मंदिर हे समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे केंद्र आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन उभारलेले हे मंदिर गावाच्या एकतेचे प्रतीक असून, अशा उपक्रमांमुळे समाजसेवेची नवी प्रेरणा मिळते.

या कार्यक्रमास सरपंच रविदास किन्नाके, महेंद्र डाखरे, सुरेश तोडासे, प्रवीण मडावी, राजू तोडासे, तुळशीराम किन्नाके, तुळशीराम मडावी, दिवाकर डाखरे, सुधाकर डाखरे, कैलास मडावी, प्रदीप तोडासे यांच्यासह श्री हनुमान देवस्थान उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here