Home
Home चंद्रपूर ‘दंडकारण्य’ काव्यसंग्रहाच्या लोकार्पणाचा सोहळा १६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरात

‘दंडकारण्य’ काव्यसंग्रहाच्या लोकार्पणाचा सोहळा १६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरात

लोकदर्शन चंद्रपूर :👉मोहन भारती

साहित्यप्रेमींसाठी एक खास पर्व ठरणारा काव्यसोहळा चंद्रपूरात रंगणार आहे. फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपूर आणि अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशित कवी अविनाश पॉंडेकर लिखित ‘दंडकारण्य’ या काव्यसंग्रहाचा लोकार्पण आणि चर्चासत्र सोहळा रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, श्रमिक पत्रकार भवन, वरोरा रोड, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. चंद्रकांत वानखेडे (नागपूर) भूषविणार आहेत, तर विशेष अतिथी म्हणून मा. डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर) उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. फुसुमताई अलाम (गडचांदूर), मा. धनंजय सावळे (चंद्रपूर) आणि मा. डॉ. जयश्री कापसे-गायवडे (चंद्रपूर) सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यात ‘दंडकारण्य’ काव्यसंग्रहातील विषयवैविध्य, मानवी मूल्ये आणि निसर्गाशी असलेले नाते या बाबींचा ऊहापोह होणार असून, कवी अविनाश पॉंडेकर यांच्या लेखनातील सामाजिक भान आणि भाषिक ओज या विषयांवर चर्चा होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नरेशकुमार बोरीकर (चंद्रपूर) करतील.
प्रास्ताविक मा. डॉ. किशोर कर्के (राजुरा) तर आभार प्रदर्शन मा. विजय वाटेकर (चंद्रपूर) सादर करतील.

फिनिक्स साहित्य मंच आणि अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमासाठी सर्व साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
साहित्य, कविता आणि चिंतनाचा हा उत्सव नक्कीच रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here