लोकदर्शन राहुरी 👉 कैलाश पुरी
राहुरी :दिनांक 23सप्टेंबर
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक पुजा दहातोंडे यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीच्या आधारावर, चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आणि लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य अटक करण्यात आले.
अटक केलेले दांपत्य :
1. बजरंग कारभारी साळुंखे (वय ३९, दवणगाव, राहुरी)
2. शितल बजरंग साळुंखे (वय ४०, दवणगाव, राहुरी)
सदर प्रकरणातील तिसरा आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय ३२, राहता) यास अटक करणे अजून बाकी होते.
पोलीस तपासात उघडकीस आले की, बजरंग साळुंखे यांनी मार्च २०२५ मध्ये निलेश सारंगधर याचा खून केला. मृतदेह घरामागील खड्ड्यात लपवण्यात आला होता. मृत व्यक्तीची ओळख तपासात निलेश जगन्नाथ सारंगधर म्हणून निश्चित झाली.
तपासात हेही निष्पन्न झाले की, आरोपी दांपत्याने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत अनेक पैसे घेऊन लग्न लावण्याचे घोटाळे केले होते.
पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या नेतृत्वात, राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास टीमने घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेतला आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पोस्टमार्टम करुन अंत्यविधी सरकारी पंचांच्या देखरेखीखाली पार पडली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.